कोल्हापूर प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत अजित पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, सुनील तटकरे उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली. नुकत्याच झालेल्या बिद्रेतील दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात घेतलेली भूमिका त्यांना नडली आहे. गेल्या दोन वर्षापासून ए वाय पाटील ही नाराज होते आता ते भाजपमध्ये जाणार की? कोणती वेगळी भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.