कोल्हापुरात डोक्यात दगड घालून युवकाचा खून…

कोल्हापूर ( प्रतिनिधी) मद्यपान करत असलेल्या दोघांनी डोक्यात दगड घालून युवकाचा खून केला. बुधवारी (ता.२९)मध्यरात्री ही घटना घडली. शुभम अशोक पाटील (वय २८ रा. रामानंदनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.

या घटनेची माहिती पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुभम पाटील आणि संशयित शुभम उर्फ बंडा मोरे (रा. नेहरूनगर) या दोघांच्यात वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी बुधवारी मध्यरात्री निर्माण चौक मैल खड्डा परिसरात शुभम पाटील, शुभम मोरे आणि संग्राम पाडळकर (रा. हॉकी स्टेडियम जवळ) हे तिघे मद्यपान करत बसले होते.

तिघांमध्ये वाद मिटवण्यासाठी चर्चा सुरू असताना शुभम पाटील आणि शुभम मोरे यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादातून मारामारी झाली. दोघां संशयितानी शुभम पाटील याच्या डोक्यात दगड घालून खून केला. खुनाची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश गुरव घटनास्थळी दाखल झाले .त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम करत संशयित शुभम मोरे आणि संग्राम पाडळकर यांना अटक केली.

🤙 9921334545