संताजी घोरपडे कारखान्याला ऊस कमी पडू नये,म्हणूनच बिद्रीच्या सभासदाकडे हेतूपुरस्कर दुर्लक्ष : राजे समरजितसिंह घाटगे

सावर्डे बुद्रुक : बिद्री, गाळप क्षमतेने मोठा व जुना कारखाना आहे.तरीही संताजी घोरपडे कारखान्याला ऊस कमी पडू नये म्हणूनच शेतीसेंटर कडील ऊस उपलब्धतेप्रमाणे पुरेशी तोडणी वाहतूक यंत्रणा उपलब्ध करून दिली नाही.यातूनच बिद्रीच्या सभासदाकडे हेतूपुरस्कर के पी पाटील साहेब आणि मुश्रीफ साहेब यांनी दुर्लक्ष केले आहे.असे स्पष्ट मत राजे समरजितसिंह घाटगे व्यक्त केले.

राजर्षि शाहू परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचार बैठकीत ते बोलत होते.पिराचीवाडी, सावर्डे बु,सावर्डे खू, कुरणी या गावात त्यांनी झंझावाती प्रचार बैठका घेतल्या. त्यांच्यासोबत उमेदवार रणजीत पाटील मुरगुड यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले,कागल मधील कार्यक्षेत्रातील गावातून जवळपास 51 टक्के ऊस हा संताजी घोरपडे कारखान्यास गेलेला आहे. यामुळे सभासदांचे, कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे.या आर्थिक नुकसानीला जबाबदार कोण? लै भारी कारभार म्हणणारी सत्ताधारी मंडळी स्थानिक सभासदांचा, शेतकऱ्यांचा ऊस बिद्रीस जाणीवपूर्वक नेत नाहीत. मग बिद्रीच्या उच्चांकी ऊसदराचा सभासद, शेतकऱ्यांना काय फायदा? बिद्री कारखान्यास कागल तालुक्यातील पंधराहजारहून अधिक सभासद आहेत. सर्वांचा ऊस वेळेत जावा यासाठी जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मुश्रीफ साहेब यांनी के पी पाटील यांना जाब का विचारला नाही? बिद्री कारखान्याचा उल्लेख मातृसंस्था म्हणून करण्यात येतो.मग स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्काच्या मागण्यावर ,उदा. ऊसतोड,ऊस वाहतूक, कार्यक्षेत्रात उसाचे उत्पादन वाढावे यासाठीचे प्रयत्न, कामगार भरती याबाबत अन्याय झाला आहे.हा दुजाभाव का ?

याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
या सदोष व्यवस्थापन प्रणालीला कंटाळून आमच्या पॅनेलला पाठिंबा देण्यासाठी अनेक घटक पुढे येत आहेत. ” अभी नही तो कभी नही ” या उक्तीनुसार निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे.


…….व्यथा ऐकून थक्क झालो.

राजे म्हणाले. चार दिवस आम्ही प्रचाराच्या निमित्ताने गावोगावी फिरलो, काही सभासद ,शेतकऱ्यांनी मी बिद्रित सुरुवातीपासून सभासद असून माझा ऊस नेला नाही, मला पुरेशी वाहतूक यंत्रणा दिली नाही, मला सभासद करून घेतले नाही, माझ्या नावावर ऊस गेला नसल्याने माझा शेअर्स ट्रान्सफर झाला नाही, नावावर उस न गेलेने निवडणुकीचा फॉर्म भरू शकलो नाही, यावर कळस म्हणून चिठ्ठीवर नोकरीला लागलो, चिठ्ठीवर रिटायर व्हायची वेळ आली,अजून कायम नाही अशा अनेक कटू भावना स्पष्ट शब्दात व्यक्त केल्या. हे ऐकून थक्क झालो.

🤙 8080365706