काहींनी अडचणी निर्माण केल्या पण…. : सतेज पाटील

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : महापालिकेत काहींनी अडचणी निर्माण केल्या पण कोल्हापुरकरांच्या नशिबात पाणी होते,म्हणून ही काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाली,असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.थेट पाईपलाईन योजना पूर्णत्वासाठी योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचा सर्वपक्षीय भव्य नागरी सत्कार व वचनपूर्ती लोकसोहळा ऐतिहासिक दसरा चौक येथे पार पडला.यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले,अनेक अडचणी आल्या हा प्रकल्प थांबला .काहींनी 8 – 9 वर्षात टीका केली.योजना झाली तरी बंटी पाटील जबाबदार आणि नाही झाली तरी बंटी पाटीलच जबाबदार अशी टीका झाली.पण याचा मला आनंद आहे.कारण यामुळेच ही योजना पूर्ण झाली.महापालिका अधिकाऱ्यांनीही या कामी आम्हाला मदत केली.दिवाळीला भाऊ बहिणींना पाणी मिळाव ही आमची अपेक्षा होती आणि ते मिळालं असही पाटील यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना शाहू महाराज म्हणाले, अनेक अडथळे आले पण मात करून बंटी पाटील यांनी योजना पूर्ण केली.त्यांचा राजकीय दृष्टिकोन कोणाला कळत नाही.ते ठरवतात ते करून दाखवतात मग सांगतात.भविष्यकाळात त्यांच्याकडून अजून अपेक्षा करू शकतो .त्यांना आपण साथ द्यावी.ते नक्की पूर्ण करतील.

यावेळी छत्रपती शाहू महाराज,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,आ. राजुबाबा आवळे, आ.पी.एन पाटील,आ.ऋतुराज पाटील, आ.जयश्री जाधव,भारती पोवार,विजय देवणे,आर.के .पोवार,व्ही.बी .पाटील आदी उपस्थित होते.

🤙 8080365706