महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत जिल्हास्तरीय “दिवाळी मेळावा ”

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम ) कोल्हापूर मार्फत नवतेजस्विनी –महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने
७ नोव्हे ते ९ नोव्हे २०२३ असे एकूण तीन दिवशीय “दिवाळी मेळावा” सकाळी ९.०० वाजल्यापासून ते रात्री ९.०० पर्यंत दैवज्ञ बोर्डिंग मंगळवार पेठ येथे आयोजित करण्यात आलेला आहे .


सदर प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षेखाली तसेच नाबार्डचे विकास अधिकारी आशुतोष जाधव, कृषी व पणन सर व्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले , अग्रणी व्यवस्थापक ,बँक ऑफ इंडिया गणेश गोडसे,तसेच विविध शासकीय विभागातील अधिकारी यांच्या उपस्थित करण्यात येणार आहे .
सदर प्रदर्शनमध्ये माविम स्थापित एकूण ४० बचत गटाचा स्टाँल सहभागी होणार आहेत यामध्ये प्रामुख्याने दिवाळी निमित्त बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेले कोल्हापुरी मसाले ,चहापूड , ,मातीची नक्षीदार भांडी ,विविध प्रकारच्या साड्या ,आकाशदिवे /आकाश कंदील ,लहान मुलांची खेळणी ,अगरबत्ती ,दिवाळीचे फराळ ,पणत्या ,दिवे ,ज्वेलरी व महिलां व लहान मुलांचे कपडे ,नाचणी बिस्किटे,रोट ,हर्बल प्रोडक्ट ,दिवाळी चकली ,भाकरवडी तसेच खाद्यपदार्थचे निवडक स्टाँल लावण्यात येणार आहेत .
बचत गटातील महिलांना उद्योग व्यवसाय करताना कोणकोणत्या अडचणी येतात त्या कशाप्रकारे सोडविला पाहिजे याकरिता विविध शासकीय विभागकडून कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे तसेच महिलांना आपली वस्तू कशी विकली जाईल ,संभाषण कौशल्य कसे असावे याची माहिती दिली जाणार आहे .तसेच महिलांच्या कला गुणांना वाव देणार संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे .

या “दिवाळी मेळावा” साठी जास्तीत जास्त लोकांनी भेट देण्यात यावी जेणेकरून बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूची विक्री होवून त्यांची आर्थिकउत्पन्न वाढ होण्यास मदत होईल असे आवाहन जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे यांनी केले आहे.