कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर एलोन मस्के यांनी डागली टीकेची तोफ

नवी दिल्ली : खलिस्‍तानी दहशतवादी निज्‍जर याच्‍या हत्‍या प्रकरणी भारतावर निराधार आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आता पुन्‍हा एकदा चर्चेत आले आहेत. आता जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्रुडो यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.,ट्रूडो कॅनडातील भाषण स्वातंत्र्य संपवू इच्छितात, हे लज्जास्पद आहे, असे मस्‍क यांनी म्‍हटले आहे.

कॅनडा सरकारच्या एका निर्णयानंतर मस्क यांनी ही टीका केली आहे काय?कॅनडा सरकारने एक आदेश काढला. या आदेशानुसार आता सर्व ऑनलाईन स्टीमिंग सेवा सरकारी रेकॉर्डमध्ये अधिकृतपणे नोंदणीकृत करणे अनिवार्य करण्‍यात आले आहे. ऑनलाईन स्‍टीमिंग सेवेवर सरकारचे नियामक नियंत्रण ठेवण्‍यासाठी हा निर्णय घेण्‍यात आला आहे.

कॅनडा सरकारच्या या आदेशावर सर्व स्‍तरातून टीका होत आहे. पत्रकार आणि लेखक ग्लेन ग्रीनवाल्ड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, यामध्‍ये त्‍यांनी म्‍हटलं आहे की, कॅनेडियन सरकारने जगातील सर्वात दडपशाही ऑनलाइन सेन्सॉरशिप योजना आणली आहे. ज्या अंतर्गत पॉडकास्ट असलेल्या सर्व ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवांना सरकारी रेकॉर्डमध्ये अधिकृतपणे नोंदणी करावी लागेल, जेणेकरून सरकार ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवांवर नियामक नियंत्रण वापरू शकेल.

ट्रूडो कॅनडातील भाषण स्वातंत्र्य संपवू इच्छितात : मस्‍कग्लेन ग्रीनवाल्ड यांच्‍या कॅनडा सरकारवर टीका करणार्‍या पोस्टला उत्तर देतानामस्क यांनी सोशल मीडिया पोस्टमधून प्रतिक्रिया दिली आहे. त्‍यांनी म्‍हटले आहे की, ‘ट्रूडो कॅनडातील भाषण स्वातंत्र्य संपवू इच्छितात, हे लज्जास्पद आहे.ट्रूडो सरकारवर भाषण स्वातंत्र्याचे उल्लंघन केल्याचा आरोप यापूर्वी फेब्रुवारी 2022 मध्येही झाला होता.

ट्रूडो सरकारने आणीबाणीच्या अधिकारांचा वापर केला होता. कॅनडाच्या इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच घटना होती. कोरोना महामारीच्या काळात ट्रक चालकांनी कोरोनाची लस घेण्याच्या आवश्यकतेला विरोध केला होता. त्यानंतर कॅनडाच्या सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणीबाणीच्या अधिकारांचा वापर केला होता.भारत आणि कॅनडामधील वादामुळे ट्रूडो चर्चेतभारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधातील तणाव कायम आहे. जून महिन्‍यात कॅनडामध्‍ये खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. भारताने कॅनडाचे आरोप फेटाळले आहे. दोन्ही देशांमधील बिघडलेल्या संबंधांमुळे भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा स्थगित केली आहे.