या शिक्षकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना केली मोहम्मद घोरीशी ; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना अनेकदा इतर व्यक्तीसोबत केल्याचे दिसून येते. मात्र काही लोक त्यांच्यावर टीका देखील करत असतात. आता चक्क एका शिक्षकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना मुघल राज्यकर्ता मोहम्मद घोरी याच्याशी केली आहे.

याआधी देखील अनअकॅडमीचे शिक्षक करण सांगवान यांनी विद्यार्थ्यांना सुशिक्षित उमेदवारांना मत देण्यास सांगितल्यानंतर ते चर्चेत आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा अनअकॅडमी चर्चेत आली आहे. अनअकॅडमीचे शिक्षक अवध ओझा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना मोहम्मद घोरीशी केली आहे.शिक्षकाचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये शिक्षक अवध ओझा हे मुघल घराण्याप्रमाणे मोदी घराणेही असेल असे म्हणताना दिसत आहे.

ते पुढे म्हणतात की, पंतप्रधान मोदींना मुले नसतील तर हा मुद्दा नाही कारण मोहम्मद घोरीलाही मूल नव्हते.ते पुढे म्हणतात की संसदेची नवी इमारत मोदींचा राजवाडा असेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कशाची वाट पाहत आहेत. संविधान वगैरे भंग केलं पाहिजे. आता वेळ आहे त्यांनी मुकूट घालायची.

मुघलं घराणं पुस्तकातून काढण्यात आलं आहे, त्यामुळं आता कुठलंतरी घराणं शिकावं लागेल.मोहम्मद घोरीलाही मूल नव्हते. जे कमांडर होते तेच त्यांची मुलं होती. संसदेची नवी इमारत मोदींचा राजवाडा असेल, असंही ते पुढे म्हणाले आहेत.

News Marathi Content