नवी दिल्ली : भारतात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर बनलेल्यांना आता अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांमध्ये प्रक्टिस करता येणार आहे. यासाठी जागतिक फेडरेशन फॉर मेडिकल एज्युकेशननं नॅशनल मेडिकल कमिशनल परवानगी दिली आहे.
भारताला 10 वर्षांच्या कार्यकाळासाठी हा दर्जा प्रदान करण्यात आला आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात असं म्हटलं आहे. सर्व मेडिकल कॉलेजला मिळणार फायदाराष्ट्रीय मेडीकल कमिशनला दहा वर्षांसाठी ही मान्यता देण्यात आली आहे. याचा अर्थ असा की भारताच्या सर्व ७०६ मेडिकल कॉलेजेसना WFMEची मान्यता मिळाली आहे. तसेच जी नवी मेडिकल कॉलेज देशात सुरु होतील त्यांना आपोआप याची मान्यता मिळणार आहे.
पुढील दहा वर्षांसाठी याचा फायदा घेता येणार आहे.विद्यार्थ्यांना होणार हा फायदाया निर्णयामुळं भारतीय मेडिकल कॉलेजमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांना किंवा डॉक्टर्सना जागतीक स्तरावर काम करण्याची संधी मिळेल. यामुळं भारतातील वैद्यकीय शिक्षणाचा स्तर उंचावेल. त्याचबरोबर भारतात परदेशातूनही विद्यार्थी शिक्षणासाठी येऊ शकतील. कारण इथल्या डिग्रीसह त्यांना बाहेर काम करता येणार आहे.
ग्रामीण भागात काम करण्याच्या सरकारी धोरणांचं काय?या नव्या निर्णयामुळं आता भारतात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर थेट अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांची वाट पकडतील. पण सरकारी धोरणानुसार भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांमधून शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांनी देशातील ग्रामीण भागात जाऊन काही वर्षे सेवा देणं बंधनकारक आहे.