
मुंबई : निजामकालीन नोंदी असलेल्या मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.त्यांच्या घोषणेनंतर आता जरांगे यांच्या निर्णयाकडे राज्यभराचे लक्ष लागलं होतं. पण मनोज जरांगे आपल्या आंदोलन आणि उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहे. यावेळी बोलताना मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, वंशावळीची अट ठेवू नये अशी मागणी यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी केली आहे.
त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. वंशावळीचे दस्ताऐवज अनेक लोंकाकडे नाहीत. तर वंशावळीची अट ठेवू नये अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारचा निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, पण त्यामध्ये थोडा बदल करण्यात यावा, सरकारने तो बदल करून घ्यावा आम्ही निर्णय घेतो असंही जरांगे यावेळी म्हणाले आहेत.
