आज कोल्हापूर कडकडीत बंद

कोल्हापूर : जालन्यातील लाठीमार प्रकरणाच्या निषेधार्थ आज कोल्हापूर बंदला सुरुवात झाली आहे. बंदला सर्व थरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचे आयोजन करण्यात आले आहे.मराठा आरक्षणासाठी वज्रमूठआंदोलनाच्या निमित्ताने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, ठाकरे गट शिवसेना, स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलनाची धग कायम ठेवण्याचा निर्धार करीत मंगळवारी कोल्हापूर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज कोल्हापूर बंदला सुरुवात झाली. सकाळपासून शहरातील सर्व व्यवहार बंद होते. बाजारपेठमधील दुकाने बंद राहिली. शहरातील तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन चोकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. व्यापारी पेठांमधूनही पोलीस पाहणी करताना दिसत आहेत.

🤙 9921334545