नॉन शेड्यूल्ड बँकांमध्ये यू पी आय सेवा देणारी राजे बँक राज्यातील पहिली सहकारी बँक: राजे समरजितसिंह घाटगे

कागल: नाॕन शेड्युल्ड बँकांमध्ये यूपीआय सेवा देणारी राजे बँक राज्यातील पहिली सहकारी बँक आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. येथील श्रीराम मंदिर मध्ये राजे बँकेच्या युपीआय सेवा उदघाटन व क्युआर कोड स्कॕन स्टँड वितरणवेळी ते बोलत होते.

समरजितसिंह घाटगे व सौ नवोदिता घाटगे यांनी बाजारात विविध ठिकाणी खरेदी केली.त्याची रक्कम क्युआर कोड स्कॕन करुन देऊन या सेवेचे लाॕचींग आगळ्या-वेगळ्या पद्धतीने केले. तसेच सहकारमहर्षी स्व .विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या अमृत महोत्सवी जयंती निमित्त ‘राजे बँक आपल्या दारी’ या अभियानाचा शुभारंभही त्यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाला.श्री घाटगे पुढे म्हणाले स्व. राजेसाहेबांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे राजे बँकेसह शाहू ग्रुप मधील सर्वच संस्थांचा कारभार सुरू आहे. त्यांच्या शिकवणीनुसार छोट्या ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून अधिकाधिक सेवा देण्यात येत आहेत. प्रसंगी राजकीय किंमत मोजू पण बँक व ग्राहकांच्या हिताशी तडजोड करणार नाही.

यावेळी बँकेचे संचालक राजेंद्र जाधव, विष्णू नेर्ले, विशाल पाडळकर, नीलेश पगडे यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपिठावर व्हाईस चेअरमन नंदकुमार माळकर संचालक आप्पासो भोसले, आप्पासो हुच्चे, प्रकाश पाटील, रणजीत पाटील, बाबासाहेब मगदूम, सुरेश पिष्टे, उमेश सावंत, कल्पना घाटगे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक चव्हाण उपस्थित होते. स्वागत चेअरमन एम.पी.पाटील यांनी केले.आभार संचालक प्रकाश पाटील यांनी मानले.

…आणि स्व.राजेसाहेबांच्या आठवणीने सर्वांचे डोळे पाणावले..

व्हिडिओ क्लिप द्वारे बँकेच्या प्रगतीचा कार्यक्रमस्थळी आढावा घेताला. त्यामध्ये स्व.राजेसाहेबांचे बँकेच्या एका कार्यक्रमातील मनोगताचा समावेश होता. यामध्ये त्यांनी बँकेच्या संस्थापकाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. तसेच बँकेच्या संचालकांना व्यक्तीगत हितापेक्षा सार्वजनिक व ग्राहक हिताला नजरेसमोर ठेवून काम करणे विषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या आठवणींमुळे उपस्थितांचे डोळे पाणावले.