कोल्हापुरात आरटीओ कार्यालयात वाहनधारकांना विना हेल्मेट ‘नो एन्ट्री’..!

कोल्हापूर : कोल्हापुरात हेल्मेटसक्ती चे प्रशासना मार्फत परिपत्रक जारी करण्यात आल्यानंतर आता कोल्हापूतील आरटीओ विभाग कार्यालयापासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आरटीओ विभागामार्फत दंडात्मक कारवाईची मोहीम राबवली जात आहे. हेल्मेट सक्ती करताना कठोर नियम करण्यात आले आहेत. त्यामुळं आता कोल्हापुरातील आरटीओ विभागात येणाऱ्या वाहनधारकांना विना हेल्मेट नो एन्ट्री असणार आहे.

या कारवाईअंतर्गत आरटीओ कार्यालयात प्रवेश करणाऱ्या वाहनधारकांनी वाहतूक पोलिसांमार्फत हेल्मेट सक्तीची दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.आत्तापर्यंत अनेक वाहनचालकांवर कारवाई झालेली आहे.

त्याचबरोबर विना हेल्मेट, सीट बेल्ट न लावणे, व वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवरही दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. कार्यालयात दुचाकी सह येताना हेल्मेट घालून प्रवेश करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या नो हेल्मेट नो एन्ट्री मूळ कार्यालयात मात्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे.या कारवाईवेळी वाहनधारकांना सीटबेल्ट आणि हेल्मेट परिधान करण्यावर समुपदेशन करण्यात येत आहे. दुचाकी चालकांनी हेल्मेट परीधान करूनच दुचाकी चालवावी आणि आपल्या जिवीताची काळजी घ्यावी आणि दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन आरटीओ प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

🤙 8080365706