नागरिकांना मोफत आरोग्य सेवेसाठी “आपला दवाखाना”……

कागलमधील कै. मियालाल मुश्रीफ नगरमध्ये आपला दवाखानाचे लोकार्पण

नागरिकांना मिळणार मोफत उपचार आणि औषधेही……

कागल : सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या आशिर्वादाने मला सातत्याने मंत्रिपद मिळत राहिले आहे. या पदाचा उपयोग जनतेचे राहणीमान उंच्चावीण्यासाठी. त्यांचे आरोग्य उत्तम रहाण्यासाठी वैद्यकीय सेवेला प्राधान्य देत लाखों रूग्णांवर  मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करून आणण्याचे   काम माझ्या हातून झाले. लहान -सहान  किरकोळ आजारांवरील उपचारासाठीही आता पैसे खर्च करण्याची गरज नाही. त्यासाठी  सरकारी ” आपला दवाखाना ” तुमच्या परिसरात सुरू केला आहे. येथे होणाऱ्या मोफत उपचारांचा लाभ घ्या, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहायत्ता मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कागल शहरात असे दोन दवाखाने सुरू झाले आहेत, अजून दोन दवाखाने सुरू करणार आहे, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.

कै. मियालाल मुश्रीफ नगरमधील घरकुल ईमारतींचे दोन कोटी रूपये खर्चून दुरूस्तीकरण, दावणे वसाहत येथे “आपला दवाखाना” उदघाटन, घरकुलसह दावणे वसाहत, बिरदेव वसाहत,राजीव गांधी वसाहत येथील ३५० कुटुबांना धान्यकिट वाटप या संयुक्त कार्यक्रमात ते मुश्रीफ बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले की, विशेष सहाय्य खात्याचा मंत्री झाल्यानंतर   निराधार योजनेची पेन्शन 1500 रूपये करण्याचे भाग्य मला लाभले. ही पेन्शन 2000 रूपये केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.    

माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले, जे घरकुलला विरोध करीत होते, तेच आज येथे मते मागायला येत आहेत. विरोधी गटाच्या कांही नगरसेवकांनी घरकुलचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधाला न जुमानता अत्यंत कष्टाने व चिकाटीने हे घरकुल पुर्ण केले, याची नेहमी आठवण ठेवा. नामदार श्री. मुश्रीफसाहेबांनी  मोफत  घर  दिले आहे, याचा विसर पडू देऊ नका. प्रवीण काळबर म्हणाले, महाराष्ट्रात कोठेच अशी घरकुले पुर्ण झालेली नाहीत. मंत्री हसन मुश्रीफ  यांच्यामुळेच हे शक्य झाले आहे. देखभाल दुरूस्ती लाभार्थ्यांनी करावयाची आहे. तरीसुद्धा मुश्रीफ दोन कोटीचा निधी देखभाल दुरूस्तीसाठी उपलब्ध करून दिला आहे. आता यापुढे तरी घरकुलवासीयांनी काळजी घ्यावी.          

असा आहे आपला दवाखाना…….!

दिल्लीमध्ये मोहल्ला क्लिनीक आहेत, त्याच धर्तीवर शहरी भागात हे दवाखाने सुरू केले जात आहेत. कागल शहरात ग्रामिण रूग्णालय आहे. तेथे किरकोळ आजारासाठी लोक जाणे टाळतात. दावणे वसाहत आणि वड्डवाडीत हे दोन “आपला दवाखाना” सुरू झाले आहेत. सकाळी नऊ ते सायंकाळी पाचवाजेपर्यंत येथे एक एमबीबीएस  डाॅक्टर, नर्स, आरोग्यसेवक, दोन सहाय्यक  असे पाचजण रूग्णसेवेसाठी उपस्थित असतील. औषधे व उपचार  पुर्ण मोफत मिळणार आहेत.

सागर दावणे यांनी स्वागत केले. यावेळी प्रविण काळबर, प्रकाश गाडेकर, भय्या माने यांची भाषणे झाली. कार्यक्रमास चंद्रकांत गवळी, नवल बोते, अतुल जोशी, संजय चितारी, अजित कांबळे, शशिकांत नाईक, सौरभ पाटील, मानसिंग दावणे, भिकाजी देवकर, संतोष रजपुत  आदी मान्यवरांसह घरकुल परीसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.