
कोल्हापुर: 4 ऑगस्ट हा आचार्य, आयुर्वेदाचार्य, पूज्यनीय बाळकृष्ण जींचा जन्म दिवस,पतंजली परिवार. जडी बुटी दिवस म्हणून साजरा करतो याचे औचित्य साधून पतंजली योग पीठ हरिद्वार द्वारा संचालित, महिला पतंजली योग समिती कोल्हापूर तर्फे गिलोय, आवळा, अश्वगंधा,रिठा, लिंबारा,शमी, पेपरमेंट तुळस, बहुगुणी इत्यादी वनस्पती चे महत्व सांगून 2000 लोकांना गिलोय कांड्या चे वाटप, 500 औषधीय वनस्पतीच्या रोपांचे वितरणआणि दृश्यम आय केयर सेंटर कोल्हापूर तर्फे नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले आहे.

त्यात नेत्र तज्ञा द्वारे माफक दरात नेत्र तपासणी (जर्मन टेक्नोलॉजी वापरुन) चष्याचा नंबर काढून देणे व माफक दरात चष्मा देणे मोतीबिंदू ची तपासणी मोतीबिंदूचे ऑपेरेशन साठी नोंदणी व अतिशय माफक दरात बिन टाक्याची फेको शस्त्रक्रिया (अमेरिकन मशीनद्वारे) इतर काही डोळ्यांचे त्रास असल्यास त्याची तपासणी करण्यात येईल राजलक्ष्मी नगर विश्वस्त तरुण मंडळ यांचे सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न होत आहे तरी पतंजली परिवारातील सर्व मंडळी,त्यांचे नातेवाईक, मित्र मंडळी, राजलक्ष्मी नगरातील सर्व नागरिकआणि पतंजली परिवारा व्यतिरिक्त व्यक्ती सुद्धा निमंत्रित आहेत. तरी सर्वांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. तसेच नेत्र शिबिरासाठी नोंदणी आवश्यक आहे.तरी इच्छुकांनी नोंदणी साठी आणि अधिक माहिती साठी खालील मोबाईल नंबर वर संपर्क 7028267820/ 9699315056 करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
