मराठी शाळांप्रमाणे इंग्रजी शाळांच्या दप्तराचे ओझेही कमी करा : युवासेना ठाकरे गटाची मागणी

कोल्हापूर : शासकीय शाळांतील विध्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे जरी कमी झाले असले, तरी इंग्रजी शाळांमधील विध्यार्थी यांच्या पाठीवर ओझे कायम आहे,यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्यापही दप्तराचे भलेमोठे ओझे घेऊनच मुलांना शाळा गाटावी लागते,या ओझ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पाठदुःखीचा त्रास सहन करावा लागत आहे. मराठी शाळांप्रमाने इंग्रजी शाळांच्या दप्तराचे ओझेही कमी करावे ,अशी मागणी युवासेना ठाकरे गटाच्या वतीने शिक्षण उपनिरीक्षक रवींद्र चौगुले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पाहिली ते आठवी पर्यंत एकच पुस्तक ठेवले आहे. यात सोबत कोरी पाने जोडल्याने वेगळे काही घेऊन जावे लागत नाही. परिणामी दप्तराचे ओझे कमी झाले. इंग्रजी शाळांमध्ये मात्र पूर्वी प्रमाणे वजनदार दप्तर आणावे लागत आहे. म्हणून आज कोल्हापूर युवासेनेच्या वतीने लवकरात लवकर इंग्रजी शाळांचे देखील ओझे कमी करावे, या मागणीसाठी निवेदन देण्यात येत आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे,नुकतीच बीड मध्ये अति शैक्षणिक तणावामुळे ९ वी च्या शालेय मुलीचा हृदय विकाराने मृत्यु झाल्याची घटना घडली. याला देखील कोचिंग क्लासच्या अति टेस्टसिरीज, अति ट्युशन चा तणाव हेच कारणीभूत ठरले. याचबरोबर इंग्रजी मिडीयम मध्ये मुलांना आठवड्याला दोन -दोन तीन – तीन गणवेश कशाला? पालकांनी इतके पैसे कुठून आणायचे ? जर यावर काही दिवसात ठोस निर्णय विध्यार्थ्यांच्या बाजूने झाला नाही तर मोठे विध्यार्थी आंदोलन करू, असा इशाराही युवासेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष )यांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, शहर युवा अधिकारी संतोष कांदेकर, उपशहर युवा अधिकारी लतीफ शेख, चैतन्य देशपांडे, प्रतीक भोसले,अक्षय घाटगे,युवतीसेना शहर युवती अधिकारी सानिका दामूगडे, उपशहर युवती अधिकारी प्रिया माने, सिद्धी दामूगडे, रुद्र चौगुले, सार्थक जगताप,प्रथमेश रांगणे,इंद्रजित पाटील आदी उपस्थित होते.

🤙 8080365706