फेसबुक लाईव्ह करत दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सांगली: जिल्ह्यातील विटा शहरामध्ये एका दाम्पत्याने संघर्ष करूनही रस्ता मिळत नसल्याने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

रस्ता मिळत नसल्याने या पती-पत्नीने हा निर्णय घेतला असल्याने विट्यासह परिसरात मोठी खळबळ माजली आहे. प्रशांत प्रल्हाद कांबळे आणि स्वाती प्रशांत कांबळे असे या पती-पत्नीचे नाव असून त्यांच्यावर विटा येथील ओम श्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

🤙 8080365706