
मुंबई: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील खारमध्ये पतीने पत्नीवर भररस्त्यात चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चाकू हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

तर हल्ला केल्यानंतर आरोपी पतीने घटनास्थळावरुन पोबारा केला.
हे जोडपे धारावी पट्ट्यातील रहिवासी आहेत. दोघांचं वैवाहिक आयुष्य फारसं सुरळीत नव्हतं. त्यांच्यात वाद सुरु होते. शिवाय त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले अशल्याचं पोलिसांनी सांगितलं.
