
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष आज व्यवसायिक मंडळीना नवीन व्यापार सुरू करण्याकरिता उत्तम दिनमान आहे. योगकारक दिवस आहे. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. व्यापारात नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे.
वृषभ आज ग्रहमान अनुकूल राहतील. रचनात्मक कामात यश मिळेल. कुंटुबातील व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. रोजगारात वाढ होईल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे.
मिथुन आज प्रतिकुल दिवस असणार आहे. घातपाताचं भय रहिल. दुर्घटना गंभीर दुखापततीची शक्यता आहे. दिवस कष्टदायक स्वरूपाचा आहे. घरात वादविवादाचे प्रसंग शक्यतो टाळावेत. मन आणि वाणीवर नियंत्रण ठेवा.
कर्क आज सार्वजनिक जीवनात समाजात मानसन्मान मिळाल्याने उत्साह वाढेल. परिवारात स्नेहपूर्वक वातावरण निर्माण होईल. नवीन व्यवसायिक घटना घडणार आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील.
सिंह आज काहीसी तणावमय परिस्थिती निर्माण होईल. मनाची चलबिचल वाढेल. व्यापारात देण्याघेण्याच्या व्यवहारात सावध रहा. संततीकडे विशेष लक्ष दयावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा.
कन्या आज आपल्या कार्यक्षेत्रात कामाचा विस्तार वाढणार आहे. नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. महिलावर्गासोबत आदरभाव युक्त व्यवहार ठेवावेत. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र त्याग करा.
तूळ आज सफलतादायक दिवस आहे. परिवारात शुभ कामाचे आयोजन केले जाईल. खर्चाचा आवाका जपा. व्यापारात परिस्थिती चांगली राहिल. मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
वृश्चिक आज नियोजित कार्य वेळेत पूर्ण होईल. आपल्या कार्यक्षेत्रात सन्मान मिळेल. आर्थिक उत्पनात वाढ होईल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे.
धनु आज आकस्मिक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उद्योगक्षेत्रातील व्यक्तींना भरभराटीचा दिवस आहे. प्रत्यक्ष दूरदर्शीपणाने योग्य कामे होतील. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल.
मकर आज व्यापारी वर्गाकरीता महत्वाचा योग आहे. आज उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रवासातून देखील लाभ होईल. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. घरगुती सुविधेत वाढ होईल.
कुंभ आज मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. प्रकृतीवर विपरित परिणाम होऊ शकतात. मानसिक ताण वाढणार आहे. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील.
मीन आज व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आंनदी रहाल. व्यवसायात आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल.
