ठाकरे गटाला पुन्हा प्रतीक्षा : सुनावण्या लांबणीवर

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या दोन याचिकांवरील सुनावण्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. या दोन्ही याचिकांवरील उद्या होणाऱ्या सुनावण्या लांबणीवर गेल्या आहेत. यामुळे ठाकरे गटाला या याचिकेवरील सुनावण्यांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकांवर उद्याही सुनावणी होणार नाही. त्याचबरोबर ठाकरे गटाने दाखल केलेल्या १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणीही लांबणीवर गेली आहे. सुप्रीम कोर्टात उद्या 31 जुलैला सुनावणी होणार होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या यादीत हे प्रकरण नाही. त्यामुळे या दोन्ही याचिकांवरील सुनावण्या लांबणीवर गेल्या आहेत.

🤙 8080365706