
कागल : तालुक्याचे राजकारण या दोन गटामध्ये सर्वाधिक विभागले गेले आहे. याच तालुक्यात थोडं वेगळं चित्र शनिवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून आले. निमित्त होते इचलकरंजी शहराला सुळकूड योजनेतून पाणी देण्यास होणारा विरोध. इचलकरंजी दुधगंगा नदीतून पाणी देण्यास कागलमधील सर्वच नेत्यांनी मतभेद बाजूला एकमुखाने कडाडून विरोध केला. एकमेकांना डोळ्यासमोर न धरणारे कागल तालुक्याच्या राजकारण्यांची पाण्यासाठी झालेली एकी पाहून जिल्ह्यामध्ये चांगलीच चर्चा रंगली आणि राजकीय वर्तुळातुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या फुटीर अजित पवार गटातून मंत्री झालेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक, भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांच्यासह कागल तालुक्यातील नेते उपस्थित होते.
