खासबाग दुर्घटनेतील महिलेच्या कुटुंबियांची मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली सांत्वनपर भेट

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील खासबाग मैदानाची संरक्षक भिंत पावसाने खचल्यामुळे ही भिंत कोसळून श्रीमती अश्विनी आनंदा यादव यांचा मृत्यू झाला होता. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिवंगत अश्विनी यादव यांच्या घरी भेट दिली.

यावेळी दुर्घटनेबाबत त्यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली तसेच त्यांचे पती आनंदा यादव व दोन मुलांचे सांत्वन केले. यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम, राहुल चिकोडे आदी उपस्थित होते.

🤙 8080365706