मुख्यमंत्र्यांकडून नाशिक- ठाणे महामार्गाची पाहणी

नाशिक: राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे- नाशिक महामार्गाची पाहणी केली.

या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत असल्याच्या चर्च्यांदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वःत त्या ठिकाणी जात परिस्थीतीचा पाहणी केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे – नाशिक महामार्गाची पाहणी केली. या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत असल्यामुळे आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन या महामार्गाची पाहणी केली आणि रस्ता दुरुस्तीबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. ज्या ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे अशा सगळ्या ठिकाणचे खड्डे तात्काळ बुजविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

🤙 8080365706