
राधानगरी : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच असून धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरण ५० टक्के भरले आहे.

धरणक्षेत्रात ५५ मिमी इतका पाऊस झाला. धरणक्षेत्रात जूनपासून आजअखेर १०९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात ४१०९.१४ दलघफू इतका पाणी साठा असून पाणी पातळी ३१९.२८ इतकी झाली आहे. दरम्यान, दमदार पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा भात रोप लावणीत व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे.
