जिल्ह्यात पुन्हा उपसाबंदी लागू

कोल्हापूर : इरिगेशन फेडरेशन व लाभधारक शेतकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चेनंतर कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) यांनी पूर्वी शिथिल करण्यात आलेली उपसाबंदी रद्द करून पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

पाटबंधारे विभाग उत्तरच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिलेल्या आदेशानुसार, कार्यालयाच्या पूर्वीच्या आदेशाने शिथिल करण्यात आलेली उपसाबंदी तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पंचगंगा, भोगावती, दूधगंगा, वारणा, तुळशी, कासारी, कडवी, कुंभी, धामणी व जांभळी या नद्यांच्या दोन्ही तीरांवरील शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या सर्व उपसा यंत्रांवर 16 जून पासून पुढील आदेशापर्यंत उपसाबंदी लागू राहणार आहे.

धरणे व प्रकल्पांमधील मर्यादित पाणीसाठ्याचा विचार करून बिगर सिंचन पाणी वापरकर्त्यांनी सांडपाणी अथवा औद्योगिक वापरातील पाणी थेट नदीपात्रात सोडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रदूषित पाणी वाहून नेण्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्याने सर्व संबंधितांनी पाणी प्रदूषण व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच या स्थितीत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

🤙 8080365706