‘ लॅण्ड जिहाद’ला प्रोत्साहन देणारा अन्यायकारी ‘वक्फ कायदा’ तत्काळ रद्द करा

कोल्हापूर : लॅण्ड जिहाद’ला प्रोत्साहन देणारा अन्यायकारी ‘वक्फ कायदा’ तत्काळ रद्द करावा, या मागणीसाठी कोल्हापूर येथे आज रविवार (दि. १६) रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे. एकीकडे हिंदूंची मंदिरे सरकारीकरण करून मंदिरांची संपत्ती सरकार ताब्यात घेत आहे, तर दुसरीकडे ‘मुसलमानांची धार्मिक संस्था’ सरकार आणि नागरिक यांची संपत्ती कायद्याचा गैरवापर करत हडप करत चालली आहे. हा धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेला सुरूंग असून हे असंवैधानिक आहे. एका मोठ्या षड्यंत्राद्वारे देशभरातील भूमी हडपण्याचा अतिशय गंभीर प्रकार वक्फ कायद्याच्या माध्यमातून चालू आहे. त्यामुळे ‘वक्फ बोर्डा’चे सर्व पाशवी अधिकार काढून घेऊन त्यावर सरकारचे नियंत्रण आणायला हवे आणि ‘लॅण्ड जिहाद’ला प्रोत्साहन देणारा अन्यायकारी ‘वक्फ कायदा’ तत्काळ रद्द करावा, अशी एकमुखी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात करण्यात आली.

या प्रसंगी कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन ‘जनतेची भूमी हडपून ‘लँड जिहाद’ला प्रोत्साहन देणारा ‘वक्फ कायदा रहित करा’, ‘वक्फ बोर्डाने हडपलेल्या सर्व भूमी त्यांच्या मूळ मालकांना परत करा’, यासंह दिलेल्या घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून गेला होता.या प्रसंगी भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष आनंदराव पवळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर शहर कार्यवाह आशिष लोखंडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख (उद्धव ठाकरे गट) राजू यादव ,सुरेश यादव, नितीन चव्हाण,सचिन माळी, संदीप घाटगे, शरद माळी, रामभाऊ मेथे, भीमराव पाटील, आदित्य कराडे, नितीन काकडे, चारुदत्त पोतदार, रमेश पडवळ, संदीप पाटील, मनोहर सोरप यांच्यासह १२ हून अधिक संघटना-पक्ष यांचे १०० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 8080365706