राजकीय पोपटपंची करणारे आता गप्प का: आशिष शेलार

मुंबई : भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ‘एक सही भविष्यासाठी’ भाजपच्या या नव्या उपक्रमावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी राजकीय पोपटपंची करणारे आता गप्प का आहेत? असा सवालही उपस्थित केला आहे.

तसंच ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही आशिष शेलारांनी निशाणा साधला आहे. जगात नामवंत असणारी आयआयएम 350 जागा घेऊन मंजूर झालं आहे. येणाऱ्या अधिवेशनात ते मंजूर होईल. राजकीय पोपटपंची करणारे आता गप्प का आहेत? खोट्या बातम्या लगेच सांगता मग आता बोला ना… मुंबईमधून प्रकल्प गेले तेव्हा हे गेलं, ते गेलं हे राजकीय स्वार्थपोटी सांगितलं गेलं. पण मुंबईमध्ये आयआयएम येत आहे तर सगळे गप्प का आहेत? मुंबईवर याचं पुतना मावशीसारखं प्रेम आहे, असं म्हणत आशिष शेलार यांन विरोधकांना टोका लगावला आहे.पंतप्रधान मोदी देश घडवण्याचं काम करत आहेत. सोमवारपासून भाजप प्रत्येक कॉलेजवर विद्यार्थ्यांसाठी एक अभियान राबवणार आहे. एक सही भविष्यासाठी हा उपक्रम भाजप मुंबईत राबवणार आहे, अशी घोषणा आशिष शेलार यांनी केली आहे.

🤙 8080365706