सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणार : अजित पवार

नाशिक: अर्थमंत्री पद मिळाल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. नाशिक दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. पाऊस आणि अर्थ खात्याचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले.  सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

पंतप्रधानांची भेट घेऊन केंद्राचे याकडे लक्ष वेधणार असल्याचे ते म्हणाले. केंद्राकडून अधिक निधी मिळविण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा फटका आपल्याला बसतोय असे म्हणत अजित पवार यांनी पावसाच्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली. त्यामुळे धरणातील पाणी काटकसरीनं वापरावं लागेल असंही ते म्हणाले. पुरेशा पावसाअभावी राज्यावर दुबार पेरणीचं संकट असल्याचेही ते म्हणाले.

🤙 8080365706