विशेष ग्रामसभेच्या नियोजनाची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर : संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सोमवारी (ता. १७) विशेष ग्रामसभेचे आयोजन करावे, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सर्व ग्रामपंचायतींना दिले आहेत.

या ग्रामसभांचे नियोजन करण्याची संपूर्ण जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यां कडे देण्यात आली आहे.या ग्रामसभेत हर घर जल गाव घोषणा करणे, मुख्यमंत्री सौर कृषी प्रकल्पासाठी गायरानातील जमीन देणे, याबाबतचे ठराव मंजूर करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच हागणदारीमुक्त गाव घोषणा करणे, मैला गाळ व्यवस्थापन होत असल्याचा ठराव करणे. तसेच प्रधानमंत्री, रमाई, अटल, धनगर आवास योजनेतून सुरू नसणारी घरकुल रद्द करण्याचा महत्त्वाचा ठरावही या ग्रामसभेत केला जाणार आहे. तालुक्यातील प्रत्येक गावांतील ग्रामसभेत सदर ठराव करण्याबाबतची योग्य ती कार्यवाही करण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडून सूचना दिल्या आहेत.

🤙 8080365706