शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा खरंच फायदा होतोय का? उद्धव ठाकरे

मुंबई : “राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाहीय. सरकार दारात जातय पण तिथून परत येतय. घरात सुख, शांती, समाधान कसं लाभेल हे पाहत नाहीय. शासन आपल्या दारी फक्त कार्यक्रम केला जातोय, पण त्याचा फायदा मिळतोय का? योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी, होऊन जाऊ द्या चर्चा हा कार्यक्रम कार्यकर्त्यांना दिला आहे” असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

पाऊस म्हणावा तसा पडलेला नाही. विदर्भात काय होईल ते सांगता येत नाही. सरकारी योजनांच्या कागदी होड्या सोडायच्या कुठे? हे सरकारला विचारण्याची वेळ आली आहे. या योजनाचा लाभ मिळतोय का? याचा लोकांनी विचार करावा” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “एकूणच राजकारणामध्ये व्यस्त असलेल्या पक्षांचा जनतेला उबग आलाय. मत कोणालाही द्या, सरकार माझच बनणार असा पायंडा पडला आहे. जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडाला, तर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

🤙 8080365706