
कोल्हापूर : गेल्या महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोर धरला आहे. कोल्हापूर शहरात पावसाची उघडझाप असली तरी धरण क्षेत्रात चार दिवसांपासून पावसानं धुव्वाधार हजेरी लावली असून पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली होऊ लागले आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील राजाराम बंधारा हा आज सकाळी पाण्याखाली गेला आहे. यामुळे या वरील वाहतूक बंद करण्यात आले आहे.
दरम्यान पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पंचगंगा नदीची पाणी पातळी आणखी वाढणार आहे.
