
मुंबई : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यावरून समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघात प्रकरणी सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये? असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.

ते मीडियाशी संवाद साधत होते.संपूर्ण समृद्धी महामार्गाची एक तांत्रिक चाचणी करावी. अपघाताची जागा कुठे? अपघात का होत आहेत? हे पाहावं. फक्त राजकीय भांडवल करू नका. आम्ही केलं… आम्ही केलं म्हणू नका. आमच्या काळात महामार्ग झाला म्हणत बसू नका. यापेक्षा हे अपघात का होतात हे पाहा. गेल्या काही महिन्यात 300 पेक्षा जास्त अपघात झाले आहेत. शेकडो लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. कालचा अपघात तर भयंकर होता. त्यावर बोलावं, असं संजय राऊत म्हणाले.
