तब्बल 12 तासाने कोल्हापूर रत्नागिरी वाहतूक पूर्ववत

रत्नागिरी : मिऱ्या – नागपूर महामार्ग काल रात्री नाणीजजवळ खचला होता. त्यामुळे कोल्हापूर – रत्नागिरी वाहतूक ठप्प झाली होती. जवळ पास 12 तासानंतर ही वाहतूक पूर्ववत झाली आहे.

मात्र, अन्य दुसऱ्या मार्गाने ही वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे रस्ता खचल्याने दोन वाहने रुतून बसली होती. त्यामुळे अनेक वाहने अडकून पडली. दरम्यान, येथील रस्ता दुरुस्तीपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे कोल्हापूर- रत्नागिरी वाहतूक लांजा- दाभोळमार्गे सुरु करण्यात आली आहे.

नव्या रस्त्याचे काम करणार्‍या रवी इन्फ्रा ठेकेदाराचा निष्काळजीपणा या घटनेस कारणीभूत ठरल्याचा आरोप नाणीज ग्रामस्थांकडून करण्यात आला.रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने येथील वाहतूक धोकादायक ठरत आहे.

🤙 8080365706