
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्री सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप करत मौका सभी को मिलता है, असं सूचक विधानही जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. कळवा, मुंब्रा शहराबाबत मुख्यमंत्री कायम दुजाभाव करत असून आम्ही 10 कोटींचा जो निधी मंजूर करून आणला होता तो मुख्यमंत्र्यांनी रद्द केला आहे. आता या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मौका सभी को मिलता है, हे लक्षात ठेवावं, असा सूचक इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
