
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बिनसलं आहे. असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते, विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच बाळासाहेब ठाकरेंना विसरलात का?, असा सवाल अमोल मिटकरींनी एकनाथ शिंदेंना विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त झाले आहेत. नैराश्यातुन ते बेताल सुटले आहेत. पेशवे काळातील फडणीशी लोकशाहीत चालत नाही हे बहुतेक ते विसरलेत. मी त्यांच्या अनेक मुलाखती पाहतो मात्र परवा मुलाखतीत ते आतुन पोखरल्याचे व शिंदें सोबत बिनसल्याचे स्पष्ट जाणवते आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
हे सुराज्य व्हावे हीच जनतेची इच्छा, अशी जाहिरात केल्याचा फोटो मिटकरींनी शेअर केलाय. यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसत नाही. त्यावरून अमोल मिटकरींनी एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. बाळासाहेब ठाकरेंना विसरलात? जनता माफ करेल असं वाटतं का?, अस, असं मिटकरी म्हणाले.
