
कोल्हापूर : राज्यभरात पावसाने अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान, आता पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असताना सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मात्र भार पडताना दिसत आहे. याचं कारण पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत.

नाशिक बाजार समितीमध्ये कोथिंबीरला चक्क 170 रुपये प्रति जोडी भाव मिळाला आहे. गेल्या 24 तासात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने भाज्यांची आवक निम्म्याने घटली आहे. याचा परिणाम कोथिंबीरवर झाला आहे. कोथिंबीरीच्या जोडीचा शेकडा भाव 12 ते 17 हजारांपर्यंत गेला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत कोथिंबीरचा दर 40 ते 50 रुपये जोडी होता. दरम्यान कोथिंबीरसह शेपूची जोडी 35 ते 40 रुपयांवर गेली आहे. तसंच पालक 20 रुपये तर टोमॅटो 50 ते 70 रुपये किलो झाला आहे.
