रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरुप देणे हे योग्य नाही; कोल्हापुरातील घटनेवर शरद पवार यांचं वक्तव्य

छत्रपती संभाजीनगर ; कुणीतरी मोबाईलवर काहीतरी मेसेज पाठवला, चुकीचा असेल पण त्यासाठी रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरुप देणे हे योग्य नाही. सत्ताधारी पक्ष या घटनांना प्रोत्साहित करतो अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर घटनेवरून शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप लावला आहे.

शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्य सरकारची जबाबदारी राज्यात शांतता प्रस्थापित करण्याची असते. परंतु राज्यकर्तेच रस्त्यावर उतरायला लागले, त्यातून २ समाजात जातीत आणि धर्मात कटुता निर्माण व्हायला लागली तर ते चांगले लक्षण नाही. हे सगळे घडवले जात आहे. औरंगजेबाचा फोटो दाखवला त्यासाठी पुण्यात दंगल करण्याचे, आंदोलन करण्याचे काय कारण आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.त्याचसोबत फोटो दाखवला त्याने कुणाला काय पडलंय, ओडिशात आणि काही राज्यात चर्चेवर हल्ला केला जातो. चर्च आणि ख्रिश्चन समाज शांतता प्रिय असतो. एखाद्याची चूक असेल तर पोलीस कारवाई करेल. धार्मिक स्थळावर हल्ला करण्याची गरज नाही. हे जे काही घडतेय ते सहजासहजी एकट्या दुकट्याचे काम नाही. त्यामागे विचारधारा आहे. ती विचारधारा समाजाच्या हिताची नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं.

🤙 8080365706