
कोल्हापूर : ओरिसा येथील बालासोर जवळ तीन रेल्वेगाड्यांची एकमेकांना धडक झाल्याने मोठी जीवितहानी झाली. दुर्घटनेत आतापर्यंत 288 प्रवासी मृत्युमुखी पडले असून आठशेच्या वर प्रवासी गंभीर जखमी आहेत.आधी कोरोमंडल एक्सप्रेस व मालगाडीची धडक, नंतर त्याच ठिकाणी हावडा एक्सप्रेसची धडक झाल्याने शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाला.या दुःखद घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना ‘आप’च्या वतीने बिंदू चौक येथे जमून श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, संजय साळोखे, अमरजा पाटील, दुष्यंत माने, राकेश गायकवाड, कुमाजी पाटील, दिलीप कोळी, रवी राऊत, ऋषिकेश वीर, अमर दळवी, पूजा अडदंडे, प्रथमेश सूर्यवंशी, उमेश वडर, सदाशिव कोकितकर, संजय नलवडे, आदम शेख, अभिजीत कांबळे आदी उपस्थित होते.
