आम्ही सत्तेत आलो तर संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तेच करू; प्रकाश आंबेडकर

मुंबई : येत्या 28 मे रोजी होणाऱ्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची सत्ता गेली आणि आम्ही सत्तेत आलो तर संसद भवनाचं पुन्हा उद्घाटन करू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तेच आम्ही उद्घाटन करू. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची संसद भवनावरील नेम प्लेटही काढून टाकू, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

वंचित बहुजन आघाडीने भांडुप येथे संविधान बचाव सभा आयोजित केली होती. यावेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते. मोदी प्रचंड प्रसिद्धीलोलूप आहेत. प्रसिद्धीसाठी हावरट आणि हपापलेले आहेत. त्यांना बाजूला मंत्रीही चालत नाही. सेक्युरिटी गार्डही नकोस असतो. उद्घाटनाच्या दगडावर फक्त माझंच नाव हवं असा त्यांचा हेतू असतो. त्यांना संघाचा सपोर्ट आहे, असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी केला.

🤙 8080365706