मॉन्सून चार दिवस उशीरा….

मुंबई : विदर्भात मॉन्सूनचं आगमन १५ जूननंतर होणार आहे, नागपूर हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय. केरळमध्ये यंदा मॉन्सून चार दिवस उशीरा येणार आहे.

४ जूनला केरळमध्ये मॉन्सुनचं आगमन होईल. ११ जूनपर्यंत मुंबईत आणि १५ जूननंतर विदर्भात मॉन्सूनचं आगमन होईल, असा अंदाज नागपूर हवामान विभागाचे शास्रज्ञ गौतम नगराळे यांनी वर्तवला आहे. त्यामुळे विदर्भातील जनतेला १५ जूनपर्यंत उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहे. यंदा राज्यात कसा पाऊस होईल असा प्रश्न विचारला असता नागपूर हवामान विभागाचे शास्रज्ञ गौतम नगराळे म्हणाले की, हवामान खात्यानं केलेल्या पूर्वानुमानानुसार पाऊस सरासरीपेक्षा पाच टक्के कमी होईल.

🤙 8080365706