
मुंबई : बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग मतदान केल्यानंतर बोटावर शाईने खूण करण्याऐवजी लेझरने खूण केली जाणार आहे.

शाईची खूण पुसण्याचे फंडे अनेकांना माहीत झाले आहेत, मात्र लेझरने केलेली खूण लगेच पुसणे शक्य नाही.अनेक दिवस ही खूण बोटावर राहील, असा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात आला आहे. मतदाराच्या बोटावर लेझरने खूण करण्याचा बदल याच वर्षी पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपासून अमलात आणला जाऊ शकतो. सध्या याबाबत चाचणी घेतली जात आहे. लेझर तंत्रज्ञानामुळे मतदान प्रक्रियेतील हेराफेरी रोखता येईल, असा निवडणूक आयोगाला विश्वास आहे.
