मोदींनी स्वत: वधस्तभांकडे गेलं पाहिजे; संजय राऊत

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर मला फक्त 50 दिवसांचा वेळ द्या. सर्व ठीक होईल. त्यानंतरही जनतेला त्रास झाल्यास, माझी काही चूक निघल्यास मला भरचौकात फाशी द्या असं विधान केलं होतं.यावर नोटाबंदीचा कोणताही फायदा झालेला नाही. मोदी स्वत: म्हणाले होते, काही चुकीचे घडल्यास मला जाहीर चौकात फाशी द्या. आता लोकांनीच चौकाचौकात जाहीर फाशीचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. मोदींनी स्वत: वधस्तभांकडे गेलं पाहिजे असं आक्षेपार्ह विधान ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊतांनी यावेळी केला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेनं २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणार करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तसेच देशातील बँकांना २००० रुपयांच्या नोटा तात्काळ जारी करणे थांबवण्याचा सल्लाही यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिला आहे. यावरुन आता देशासह राज्यातील राजकारणही चांगलंच तापलं आहे. 

🤙 8080365706