
मुंबई : ६ आमदारांच्या अपत्रातेचा निर्णय घेण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. लवकरात लवकर याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर ठाकरे गटाने राहुल नार्वेकरांना तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, यावरून भाजपा नेते नितेश राणे यांनी संजय राऊतांबाबत मोठा दावा केला आहे.

नितेश राणे म्हणाले की,”भाजपाच्या नेत्यांना धमक्या दिल्या तर आम्हीही गप्प बसणार नाही. धमकी देण्याचे दिवस गेलेत. जे काही योग्य वायतंय तेच अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार आहेत. नियमांत, कायद्याच्या चौकटीत आहे तेच करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात तीन महिन्यांतच निर्णय घ्या असे आदेश आलेले नाहीत. कायद्याच्या अनुसारांतच निर्णय घेतले, तुला काय करायचंय ते कर”, असा ऐकेरी उल्लेख करत त्यांनी संजय राऊतांना आव्हान दिलं आहे.
