
नवी दिल्ली : भारतीय महिला संघाने अंडर-१९ टी-२० विश्वचषकावर नाव कोरले. दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रूम येथे रंगलेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे.

त्यापूर्वी इंग्लंडचा संपूर्ण संघ केवळ ६८ धावांवर सर्वबाद झाला होता. भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडचे फलंदाज चालले नाहीत आणि सुरुवातीच्या षटकातच त्यांचे गडी बाद होऊ लागले. इंग्लंडचे फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. भारताकडून टी. साधू, पार्श्वी चोप्रा आणि अर्चना देवी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.महिला संघाने अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकावर भारताचे नाव कोरल्यानंतर बीसीसीआयने पाच कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. याबाबत जय शहा यांनी माहिती दिली आहे.
