
मुंबई : राज्यातील राजकारणात दररोज काहींना काही घडत आहे. यातच उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाची आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची युती झाली होती. आता या युतीवर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी एक महत्वाचे विधान केले आहे.

कडू यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. बच्चू कडू म्हणाले, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती तुटली आहे. कालच प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली. केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. त्यामुळे दोघांची युती तुटल्याचं स्पष्ट आहे, असा दावा कडू यांनी केला आहे.
