
बिद्री : गोरगरीब जनतेच्या कामासाठी २४ तास उपलब्ध असणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांचे कार्य हिमालयाएवढे प्रचंड आहे. त्यांच्या तोडीचा दुसरा अन्य नेता देशात नाही. भविष्यातील सर्वच निवडणूका त्यांच्या नेतृत्वाखाली आपला गट लढणार असून २०२४ ला मुश्रीफांना विक्रमी मताधिक्याने सहाव्यांदा आमदार करुया, असे आवाहन अन्नपूर्णा शुगरचे चेअरमन व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले.

साके ( ता. कागल ) येथे १२ कोटी रुपयांच्या विकासकामांचा लोकार्पण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन घाटगे बोलत होते. बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील प्रमुख उपस्थित होते.

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर अडीच वर्षे झोपा काढणारे आमचे विरोधक आता जागे झाले असून मतदारसंघातील विकासकामे आपणच केल्याचा कांगावा करत सुटले आहेत. परंतू राजकारणात असे कोणी एका रात्रीत मोठे होत नसून अजून त्यांना बरेच टक्के टोणपे खायचे आहेत.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब तुरंबे, अशोकराव सातुसे, प्रतिक्षा निऊंगरे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास केडीसीसीचे संचालक भैय्या माने, बिद्रीचे संचालक गणपतराव फराकटे, माजी पंचायत समिती सभापती जयदिप पोवार, जगदिश पाटील, दिनकर कोतेकर, कृष्णात पाटील, डी. एम. चौगले, नानासो कांबळे, एम. एस. पाटील, के. के. फराकटे, सरपंच सुशीला पोवार, उपसरपंच रविंद्र जाधव, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत दत्तात्रय ससे यांनी केले. प्रास्ताविक निलेश निऊंगरे यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. आभार मोहन गिरी यांनी मानले.
“काय ते स्टेज , काय ते पब्लीक, एकदम ओके ……!
प्रमुख मान्यवरांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढून त्यांना कार्यक्रमस्थळी आणले. उभारण्यात आलेले भव्य व्यासपीठ, सभेला झालेली मोठी गर्दी आणि कार्यक्रमाचे नेटके नियोजन याचे सर्वच वक्त्यांनी कौतुक केले. माजी आमदार घाटगे यांनी आपल्या भाषणात, ” काय ते स्टेज, काय ते पब्लीक, एकदम ओके ……! ” असा डायलॉग मारला. यावर उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
