मुश्रीफ याना पितळ उघडे पडल्याचे दुःख….

स्टंट गिरी,आणि फसवे राजकारण कोणाचे? मुश्रीफ साहेब आत्मचिंतन करा?: भाजपच्या कार्यकर्त्याची पत्रक

कागल : कागल मधील अनेक वसाहतीतील झोपडपट्टी वसाहतीतील नियमितीकरणचा प्रश्न गेली 25 ते 30 वर्षे प्रलंबित का राहिला? सत्ता तर तुमचीच होती. मंत्री आणि आमदार पदे तुमच्याकडेच होती. मग इतकी वर्ष जाणून बूजून तुम्ही हा प्रश्न प्रलंबित ठेवला का ?याचे उत्तर द्या ?संताजी घोरपडे कारखाना तीन वर्षात उभा राहतो, तुमच्या ठेकेदार कार्यकर्त्यांची घरे, एक दीड वर्षात उभा राहतात. नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढायला तुम्हाला वेळ आहे मग या गरिबांची घरे नावावर करण्यासाठी तुम्हाला 25 वर्ष का घालवली ? मुश्रीफ खोटं बोल खरं रेटून बोल या प्रवृत्तीने स्टंटगिरीचे आणि थिल्लर राजकारण कोण करते याचे आत्मचिंतन करा? नसेल तर आमचे नेते समरजीत राजेनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देण्यास तुम्ही असमर्थ आहात हे जाहीर करा ?असा पलटवार भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आ. मुश्रीफ यांच्यावर केला.

शिंदे फडवणीस सरकारच्या माध्यमातून राजे समरजित सिंह घाटगे यांच्या पाठपुराव्यातून कागल मधील 364 घराचा नियमितीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे झोपडपट्टीतील नागरिकांनी साखर पेढे वाटून आनंद साजरा केला. याचा पोटशुळ आमदार मुश्रीफ यांना का? गेली 25 वर्ष कागल मध्ये झोपडपट्टी नियमितीकरनाचा प्रश्न प्रलंबित आहे.2018 साली मा.फडवणीस यांचे सरकार असताना राजे समरजितसिंह घाटगे यांनी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत एक दोन मिटिंग झाल्या होत्या .आम्ही कार्यकर्ते या मिटींगला हजर होतो पण दुर्दैवाने 2019 साली सरकार बदलले.पुन्हा अडीच वर्ष तुम्ही सत्तेवर आला पुन्हा हे अडीच वर्षे कामरें गाळले. सत्तेवर येतात राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यातून हा झोपडपट्टी निर्मिती करण्याचा मार्ग सुकर झाला त्यामुळे मुश्रीफ यांचे पितळ उघडे पडले आहे. समरजीत राजे यांनी विचारलेल्या प्रश्नांना ते थेट उत्तर देत नाहीत. ठराविक एक दोन कार्यकर्त्यांना पुढे कर तात. अलीकडे कोणतेही काम झाले तर ते आम्हीच केले अशी स्टंटगिरी कार्यकर्त्यामार्फत करता कारण तुमच्यात उत्तर देण्याचे धाडस नाही. पंचवीस वर्षे तुमच्यावर कागलच्या जनतेने विश्वास ठेवला. यापुढे ते शक्य नाही. जनता आता सुज्ञ आहे हळूहळू जनतेच्या लक्षात सर्वकाही येत आहे. असेही पत्रकात म्हटले आहे.

याला जबाबदार कोण? आता शिंदे फडवणीस सरकार या प्रसिद्धी पत्रकावर. नंदकुमार माळकर, राजेंद्र जाधव बाळासाहेब हेगडे, राजू पाटील, सुशांत कालेकर, गजानन माने, सचिन मोकाशी, उमेश सावंत यांच्या सह्या आहेत.

🤙 8080365706