
कोल्हापूर : महाराष्ट्रात सातत्यानं वातावरणात बदल होत आहे. सध्या राज्यात थंडीचा कडाका असून अशातच आता पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. उत्तर आणि पूर्व भागातून येणाऱ्या वाऱ्यांमुळं कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानं तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. देखील काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली होती.
पावसामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. सध्या संपूर्ण राज्यात पुन्हा थंडीचा कडाका जाणवत आहे. अशातच आता 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत ही थंडीची लाट कायम राहणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती असणार आहे. तर मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आलं होत. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता देखील वर्तवली होती. तसेच किमान तापमानात किरकोळ वाढ होईल. परंतु दिवसाच्या तापमानात अंशत: घट होण्याची शक्यता आहे. अशातच आता पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
