
गगनबावडा : एकनाथ शिंदे
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यातील शेणवडे ग्रामपंचायतीच्या नुतन उपसरपंचपदी प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आज (गुरुवार) नुतन लोकनियुक्त सरपंच सौ. उज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रकाश पाटील यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. उपसरपंच पदासाठी प्रकाश पाटील यांचे नाव नुतन सर्व सदस्यांनी सुचविले.
यावेळी नुतन सरपंच उज्वला पाटील म्हणाल्या की माझ्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत शेणवडे गावासाठी भरघोस निधी खेचून आनून शेणवडे ग्रामपंचायत कोल्हापूर जिल्ह्यात आदर्श ग्रामपंचायत बनवण्याचा प्रयत्न करू . यावेळी उपसरपंच प्रकाश पाटील शेणवडे ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे आणि हा बिनविरोध निवडीचा पायंडा कायम ठेवणार आहे असे म्हणाले . त्याचबरोबर शेनवडे गावचे सरपंच व सदस्य त्याचबरोबर शेनवडे गावचे ज्येष्ठ नागरिक यांच्या विचाराने शेनवडे गावच्या ग्रामपंचायतीचा विकास प्रगतीपथावर नेण्याचे काम करू.यावेळी सर्व नुतन सदस्य, ग्रामविकास अधिकारी शहाजी माने व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, मावळते सर्व सदस्य मंडळ, प्रमुख कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
