करवीर पूर्व पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाबा नेर्ले, उपाध्यक्षपदी प्रमोद ढेकळे तर सचिवपदी मदन अहिरे यांची निवड…

कोल्हापूर : करवीर पूर्व पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै. लोकमतचे बाबासाहेब उर्फ बाबा नेर्ले तर उपाध्यक्षपदी दै. पुण्यनगरीचे प्रमोद ढेकळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर या संघाच्या सचिव पदी न्यूज मराठी 24 चे प्रा. मदन अहिरे यांची निवड झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष मोहन सातपुते होते.स्वागत प्रास्ताविक संतोष माने यांनी केले.

अध्यक्ष- बाबासाहेब नेर्ले

तसेच या कार्यक्रमाचे सुरेश मसुटे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाचे आभार विजय कदम यांनी मानले.

उपाध्यक्ष- प्रमोद ढेकळे

संघाचे नूतन अध्यक्ष बाबासाहेब नेर्ले यांनी भविष्यकाळात पत्रकारांच्या समस्यां सोडवण्यासाठी तसेच संघाच्या विकासात्मक तत्त्वांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

सचिव- प्रा. मदन अहिरे

यावेळी संतोष माने, मालोजी पाटील (दै. तरुणभारत), प्रा. प्रवीण जाधव, प्रकाश पाटील (दै. सकाळचे), दौलत कांबळे, आनंद गुरव, सुरेश मसुटे (दै. पुढारी), मोहन सातपुते, विजय कदम (दै. लोकमत), अनिल निगडे (सिंधुदुर्ग समाचार), संदिप शिंदे (दै.महासत्ता), प्रदीप पोवार (दै. राष्ट्रगीत), विशाल फुले (दै. पुण्यनगरी), अनिल उपाध्ये, नंदू कांबळे( बी न्यूज ), चे राजेंद्र सूर्यवंशी (एस न्यूज), आणि सर्व पत्रकार यावेळी उपस्थित होते .

🤙 8080365706