
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीने धाड टाकली. राजकीय सुडाची कारवाई सुरू असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला. असून भाजपला समर्थन दिल्यानंतर कारवाई थांबल्याचे विरोधकांनी टीकास्त्र सोडले. मात्र मंत्री दादा भुसे यांनी, विरोधकांचे आरोप खोडून काढताना, कोणत्याही नेत्यावरची कारवाई थांबलेली नाही. आजही प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. याविधानाने चौकशीच्या रडारवर असलेल्या नेत्यांचे टेन्शन वाढवले आहे.

नेत्यांवर कारवाईची टांगती तलवार : मंत्री दादा भूसे पुढे म्हणाले की, शिंदे गटाच्या नेत्यांची चौकशी थांबली, असं कुठेही नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपास यंत्रणांच्या चौकशी प्रक्रियेनुसार त्या त्या प्रकरणांबाबत कार्यवाही केली जात आहे, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. त्यामुळे कारवाईच्या भीतीपोटी भाजपला सपोर्ट केलेल्या शिंदे गटाच्या नेत्यांवर आजही टांगती तलवार असल्याचे बोलले जाते. अशातच भुसे यांनीच केलेल्या गौप्यस्फोटमुळे नेत्यांची धाकधूक वाढली आहे.
